भारतरत्न मा. पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती दिन उत्साहात साजरा स्व. अटल जी यांचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठांचा करण्यात आला सन्मान .
जळगाव , दिनांक 25 डिसेंबर 2024 ( )भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जळगाव येथील भाजपा कर्यालय जी एम फाऊंडेशन याठिकाणी जेष्ठ व्यक्तिमत्त्व ज्यांना स्व. अटल जी यांचा सहवास लाभला त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रथमतः स्व. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्प अर्पण तसेच पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली . त्यानंतर अटल जी यांचा सहवास लाभलेले गजानन जोशी, परशू राम झारे, ऍड प्रविण चंद्र जंगले, सुभाष शौचे, सत्यनारायण पुरोहित , उदय भालेराव , यशवंत पाटील , विशाल त्रिपाठी , राजेंद्र मराठे , लीलाधर ठाकरे , ताराचंद पुरोहित , दीपक सूर्यवंशी , भागात बालानी, प्रकाश पंडित , सुनिल बढे , मुकुंद मेटकर.. यांचा शाल, श्रीफळ आणि क्रांतिकारकांचे कुळपुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर ही पुस्तिका देवून , मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ , आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे , जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस डॉ राधेश्याम चौधरी , महेश जोशी , अरविंद देशमुख , अमित भाटिया , प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा , महानगर अध्यक्ष भारती ताई सोनवणे , युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे यांसह भाजपा चे सर्व जिल्हा पदाधिकारी यात सर्व आघाड्यांचे अध्यक्ष , आजी माजी नगरसेवक युवा मोर्चा , महिला आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान भाजपा कर्यालय जी एम फाऊंडेशन येथे भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी आणि कविता यांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले असून , त्यास मान्यवरांनी भेट दिली
यावेळी सन्मानार्थी यांनी स्व. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे सोबतचे आठवणी अनुभव कथन करत विविध पैलू उलगडून सांगितले . विशेष म्हणजे यावेळी सुभाष जी यांनी स्व. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी 1980 सलच्या भाषणाचे उभेउभ सादरीकरण केल्याने उपस्थितांमध्ये एक उत्साह निर्माण केला . पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मध्ये साक्षात अटल जी भाषण करत आहेत असा अनुभव यावेळी सर्वांनी घेतला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राधेश्याम चौधरी यांनी तर आभार आमदार सुरेश राजू मामा भोळे यांनी मानले .
Post Comment